आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, जवळपास ६०% लोकसंख्या ही शेती क्षेत्रात काम करते आणि देशाच्या जीडिपी मध्ये १८ % योगदान देते, लोकसंख्येच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हे अतिशय कमी आहे , नॅशनल सँपल सर्व्हे प्रमाणे भारतातील 50.2% शेतकरी कुटुंब ही कर्जबाजारी आहेत.
शेतकऱ्याच्या या कर्जबाजारी पणा आणि कमी उत्पन्न याला प्रामुख्याने कुठले घटक कारणीभूत आहेत याचा अभ्यास केले असता लक्षात येते की, शेतीमधील वापरली जाणारी खते किटनाशके यांचे वाढणारे भाव , वातावरणातील अनियमितता , बाजारपेठेत शेती मालाला मिळणारा अनियमित बाजार भाव या चक्रात शेतकरी गुरफटला जात आहे यातून च कर्जबाारीपणा हा शेतकऱ्यांच्या वाट्याला येतो.
कृषीमालाला योग्य बाजार भाव मिळवता येत नाही , कारण शेतकऱ्यांना योग्य खरेदीदार आणि योग्य बाजारपेठ याचे पुरेसे ज्ञान दिले जात नाही अथवा उपलब्ध नाही, यासाठी लागणाऱ्या सुविधा चा अभाव मोठ्या प्रमाणावर पहाय ला मिळतो. तसेच शेतकऱ्यासाठी काम करणाऱ्या शासकीय आणि खाजगी यंत्रणा याच्या मध्ये ताळमेळ नसल्यामुळे बहुतेक शेतकरी हे या सुविधा आणि सवलती व ज्ञानापासून वंचित राहतात.
हिच सर्व परिस्थिती पाहून 2012 मध्ये शशांक कुमार, IIT दिल्लीचे माजी विद्यार्थी, श्याम सुंदर, IIT खरगपूर आणि IIM अहमदाबादचे माजी विद्यार्थी, NIT जमशेदपूरचे माजी विद्यार्थी अमरेंद्र सिंह, IIT धनबादचे माजी विद्यार्थी आदर्श श्रीवास्तव आणि अभिषेक डोकानिया यांनी DeHaat ची स्थापना केली.
DeHaat शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके, खते, शेत यंत्रसामग्री, पशुखाद्य आणि शेतीशी संबंधित सर्व उत्पादने, शेती सल्लागार, आर्थिक सेवा आणि शेतमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठेतील संपर्क यासह अनेक कृषी सेवा शेतकऱ्यांना पुरवते.
देहाटने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील सुमारे 7 लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांशी त्याच्या 4,000 देहाट फ्रँचायझी केंद्रांद्वारे आपल्याशी जोडून घेतले.
DeHaat शी जोडलेल्या शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसारख्या कृषी समग्री, तसेच कीड आणि रोग व्यवस्थापनावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे हवामान आधारित पीक सल्ला, मोबाइल ॲप आणि कॉल सेंटर मार्फत सुविधा उपलब्ध करून दिली.
आज Dehaat मध्ये 5000000 नोंदणीकृत शेतकरी जोडलेले असून 9500 Dehaat सेंटर द्वारे 70 विविध कृषी सामग्री या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या जातात. तसेच 250 पेक्षा जास्त कॉर्पोरेट कंपनी खरेदीदारांन मार्फत शेती मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.
dehaat च्सरुवातीच्या प्रवासात त्यांना सर्वात महत्त्वाचे चॅलेंज म्हणजे शेकऱ्याना वास्तविकता समजावून सांगणे व आपल्या आयडिया त्यांच्या पर्यंत पोहचवणे हेच होते कारण या मध्ये काम करणारे बहुसंख्य हे आयआयटी चे विद्यार्थी असल्यामुळे शेतकरी पहिला प्रश्न हा विचारात की तुम्हाला शेती विषयी काही माहिती आहे का, तुम्ही आम्हाला कसे सांगू शकता की आम्ही काय पिकवायचे आणि कसे पीकवायचे यातून त्यांना हे समजले की शेती च्या पायभूत माहिती चे किती महत्व आहे आणि ते मिळवणे किती महत्वाचे आहे.
मग या विषयाचा सखोल अभ्यास केला आणि अतिशय महत्वाचा डाटा त्यांना मिळाला यातून असे समजले की राज्यात ८०% क्षेत्रावर जी पिके घेतली जातात ती पारंपरिक पिके असून अतिशय कमी मोबदला देणारी आहेत जसे की भात शेती, गहू सारखी पिके. . यामुळे त्यांना आश्चर्य वाटले, "शेतकरी अधिक फायदेशीर पिके का घेत नाहीत?" कमी कालावधीत येणारी आणि आधिक -मूल्य असलेल्या पिकांकडे वळणे ही या समस्येची गुरुकिल्ली आहे, या एका विश्वासाने ते सर्वजण एकत्र आले.
मात्र, शेतकऱ्यांना हे समजावणे सोपे नव्हते. अनेक दशकांपासून, ते गहू आणि भातशेतीमध्ये केवळ उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत होते. आणि काही शहरी तरुणांच्या वर विश्वास ठेवून आपल्या पीक पद्धतीत बदल करणे हे त्यांना मान्य नव्हते.
देहाट टीम ने हार मानली नाही. जसजसा वेळ पुढे गेला तसतसे टीम ने आपली रणनीती बदलली. त्यांना समजले की शेतकर्यांचा विश्वास संपादन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्यांच्या सध्याच्या पिकांची गुजवत्ता सुधारण्याकडे आणि शाश्वत पद्धती लागू करण्याकडे लक्ष केंद्रित केले. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांना इच्छित परिणाम देण्यासाठी आवश्यक वेळ आणि प्रयत्नांची गुंतवणूक करणे हा त्यांचा मुळ उद्देश होता. DeHaat मधील प्रत्येक व्यक्तीने अनेक महिने शेतकऱ्यांसोबत काम केले, त्यांचे विश्वासू साथीदार बनले. या प्रक्रियेदरम्यानच त्यांच्या लक्षात आले की संपूर्ण कृषी प्रक्रिया सदोष आहे, खंडित आहे, जोडलेल्या संपूर्ण ऐवजी वेगळे तुकडे म्हणून पाहिले जाते. यामुळे शेतकर्यांच्या जीवनावर खऱ्या अर्थाने सकारात्मक प्रभाव पडू शकेल अशा सर्वसमावेशक आणि सर्वांगीण समाधानासाठी एक महत्त्वाची पोकळी यातून निर्माण झालेली आहे.
शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या पीक पद्धती मध्ये आणि मानसिकतेत बदल घडवणे हा इथे सर्वात महत्वाचा गेम चेंजर ठरणार होता. कुठले ही तंत्रज्ञान आणून फायदा होणार नाही, तर त्यांच्या पीक निवडीत बदल घडवणे आणि त्या पद्धतीची मानसिकता बनवणे ही काळाची गरज होती. या क्षेत्रात पारदर्शकपने काम करणे गरजेचे होते. ती तंत्रज्ञान च्या मध्मातून आणणे शक्य होते पण सोबत शेतकरी , ऑपरेटर, आणि शेवटच्या शेतकऱ्यानं पर्यंत काम करणारे डिलिव्हरी पार्टनर यांना ही टेक्नॉलजी वापरणे अंगवळणी पाडणे ही सर्वात कठीण गोष्ट होती.
असंख्यअनुभव घेत, काही विषयांपासून धडे घेत, अपयश आणि यश याद्वारे, DeHaat ने संपूर्ण पीकाच्या जीवन चक्रात आवश्यक असलेल्या समग्र कृषी सेवा प्रदान करण्यासाठी शेतकर्यांपर्यंत आपली ओळख निर्माण केली.
Dehaat च्या customised कृषी सल्ला शेती क्षेत्र , ठिकाण ,पीक आणि जमिनीचा प्रकार या आधारे असल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य कृती करण्यास मदत करू लागला.या आधुनिक शास्त्रीय पद्धती मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात फरक दिसून येऊ लागला.
त्यांनी 3 गोष्टी वर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले ते म्हणजे कृषी सामग्री , आधुनिक आणि तज्ञ सल्लागार सेवा व बाजारात माळ विकण्याच्या संधी , प्रीमियम कृषी-इनपुट उत्पादने, वैयक्तिक सल्लागार सेवा, आर्थिक सहाय्य आणि बाजार कनेक्शन सर्व एकाच ठिकाणी मिळवणे त्यानो शक्य केले. त्याचा सर्वसमावेशक दृष्टीकोन मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वोत्कृष्ट सेवा मिळू लागली.
देहात येथे थांबले नाही तर या मध्ये खोल वर जाऊन आणखी टेक्नोलॉजी आणि AI च्या मदतीने प्रत्येक गोष्टी मध्ये सुसूत्रता बहाल केली. स्थानिक भाषेमध्ये 30 पेक्षा अधिक पिकांची परिपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली.
देहात ने मागील 12 वर्षात शून्यातून सुरुवात करून आज 12000 देहात केंद्र पर्यंत मजल मारलीय जी संख्या 2019 ला फक्त 200 एवढीच होती. मागील 4 वर्षात हे स्टार्टअप प्रती वर्षी 3 पटीने आपली वाढ नोंदवत आहे.
यांच्या या कामाची नोंद ही नामांकित संस्था जसे की NASSCOM, Forbes मासिक , निती आयोग , the billl gates फाउंडेशन यांनी घेऊन त्यांना सन्मानित केले आहे.
काळात निर्यातक्षम पीक बनवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले उत्पन्न मिळण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे, ही तर फक्त सुरुवात आहे.