Solar yantra चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे आहे. यासाठी संयंत्रातील बॅटरी सोलर फोटोव्होल्टिक पॅनेलद्वारे चार्जिंग केली जाते. पर्यायाने वीज बचत होते. हे यंत्र पूर्णतः स्वयंचलित असून, सूर्यास्त झाल्यावर सुरू होते, सूर्योदय झाल्यावर बंद होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने सौरऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र विकसित केले आहे. २०२३ मधील संयुक्त कृषी संशोधन परिषदेत या यंत्राच्या शिफारशीस वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांची संरक्षण करण्याकरिता मान्यता मिळालेली आहे.